भाजपचा 'त्या' पुस्तकाशी काही संबंध नाही : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |


dsg_1  H x W: 0


नवी दिल्ली : आज के शिवाजी नरेंद्र मोदीया पुस्तकाच्या वादावर आता पूर्णविराम लागला आहे. भाजपचा या पुस्तकाशी काहीही संबंध नसून त्याचे लेखक जयभगवान गोयल यांनी याबद्दल माफी मागितली आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

 

भावना दुखावल्याप्रकरणी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली असून पुस्तकही मागे घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकांनंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही,’ असे जावडेकर यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

 

भाजपच्या आयटी सेलचे संजय मयूख यांनीदेखील ट्विटरवरून पुस्तकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मयूख यांचा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात मयूख यांनी सांगितले आहे की, 'गोयल यांनी हे त्यांचे वैयक्तिक लेखन असून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते मागे घेतो असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाशनही भाजपचे नाही.'

@@AUTHORINFO_V1@@