निर्भया प्रकरण : दोषींची 'ती' याचिका फेटाळली, फाशी ठरल्याप्रमाणेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणामधील दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी फेरविचार याचिका (क्युरेटीव्ह पीटीशन) केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायलयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे, त्यांची फाशी ही आता २२ जानेवारीलाच होणार हे आता निश्चित झाले आहे. काही दिवसांपूर्वी या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 

पतियाळा हाऊस कोर्टाने दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयविरुद्ध डेथ वॉरंट बजावले आहेत. त्याला आव्हान म्हणून दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटीव्ह पीटीशन म्हणजेच फेरविचार याचिका केली होती. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता तिहार तुरुंगात या चौघांना फासावर लटकावले जाणार आहे. तरीही, हे आरोपी राष्ट्रपतींकडे रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज करु शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@