मायकल पात्रा यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नेमणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |

rbi_1  H x W: 0



पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदाचा कारभार मायकल पात्रा सांभाळणार


मुंबई : रिझर्व्ह बँकेने डेप्युटी गव्हर्नरपदी मायकल पात्रा यांची नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले मायकल पात्रा विरल आचार्य यांची जागा घेतील.


२००५ पासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम कर
णारे मायकल पात्रा यांनी आयआयटी मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरण या विभागाचे सल्लागारपदही त्यांनी याआधी भूषविले आहे. १९८५ पासूनते रिझर्व्ह बँकेत कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण देखील केले आहे.


सध्या मायकल पात्रा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सदस्य आहेत. विकासाला चालना देण्यासाठी पतधोरणात व्याजदर कपातीचे पात्रा यांनी समर्थन केले. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला असून, येत्या २३ जुलै रोजी मायकल पात्रा पदभार स्वीकारतील. रिझर्व्ह बँकेत विविध विभागात तब्बल ३५ वर्षे काम करण्याचा अनुभव असणारे मायकल पात्रा पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदाची धुरा सांभाळतील.

@@AUTHORINFO_V1@@