धोनी पुन्हा वादात ; जाहिरातीत लोकांची दिशाभूल केल्याची तक्रार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. धोनीवर आता लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनी हा 'कार्स २४' नावाच्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. या कंपनीवर जाहिरातीद्वारे ग्राहकांवर दिशाभूल करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

 

'कार्स २४' ही कंपनी जुन्या गाड्यांची विक्री करणारी कंपनी आहे. भारताचा यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी गेली काही वर्ष ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून या कंपनीसोबत जोडलेला आहे. भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या दाव्यानुसार कार्स २४ ही कंपनी प्रेक्षकांची फसवणूक करत आहे. या जाहिरातीनुसार या कंपनीच्या माध्यमातून जुनी कार विकल्यानंतर लगेच पैसे दिले जातात. मात्र, भारतीय जाहिरात मानक परिषदेनुसार २६४ लोकांनी ही जाहिरात दिशाभूल करीत असल्याचे सांगितले आहे.

 

महेंद्रसिंग धोनी या कंपनीचा ब्रॅंड अम्बॅसॅडर असून या कंपनीत त्याने गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वीदेखील 'आम्रपाली ग्रुप'च्या वादात सापडला होता. यावेळी आम्रपाली ग्रृपवर पैसे घेऊन घरे न दिल्याचा आरोप होता. तसेच, त्यांच्यावर ग्राहकांकडून २,६४७ कोटी रुपयांचा निधी घेऊन तो दुसऱ्या प्रकल्पात लावल्याचाही आरोप होता. धोनी या ग्रुपचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर असल्याने या प्रकरणात अडकला होता.

@@AUTHORINFO_V1@@