काश्मीरमध्ये पुन्हा हिमस्खलन ; ५ जवानांसहित ११ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे उत्तर काश्मीरमधील अनेक भागात हिमस्खलन झाले आहे. अशाच एका हिमस्खलनात ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुपवाडा जिल्ह्यातील मच्चल भागामध्ये घडली. तसेच, काश्मिरातील विविध भागांमध्ये झालेल्या हिमस्खलनात ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आत्तातर्यंत ११ जणांचा हिमस्खलनात मृत्यू झाला आहे.

 
 

कुपवाडा, बारामुल्ला जिल्ह्यासह गंदेरबाल सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडल्या. नाईक रामेश्वर लाल, नाईक पुरुषोत्तम कुमार, शिपाई सी. बी. चौरासीया, रंजित सिंग, बच्चू सिंग अशी हिमस्खलनात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. याआधी ३ डिसेंबर २०१९ रोजी नियंत्रण रेषेजवळ हिमस्खलन झाले होते. त्या घटनेमध्ये ४ जवान शहीद झाले होते. हे सर्व जवान गस्तीवर गेले असताना दुर्घटना ही घडली होती.

@@AUTHORINFO_V1@@