संचालक योगेश सोमण यांच्या बाबतीत जे घडतेय ही असहिष्णुता नाही का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |


ashish shelar_1 &nbs



मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते व थिएटर आर्टस् या विभागाचे संचालक योगेश सोमण याच्या बाबतीत जे घडते आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी आता असहिष्णुतेत बसत नाही का? असा सवाल भाजपचे माजी शिक्षणमंत्री व आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.



पुढे ते म्हणले
,"काल थिएटर आर्टस् या विभागात शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवला जात नाही, असे मुद्दे काढून अकादमीच्या ठराविक विचारधारा असलेल्या मुलांना हाताशी धरून पुन्हा एकदा योगेश सोमण यांच्या विरोधात काही विद्यार्थी संघटनांनी मुंबई विद्यापीठात गोंधळ घातला. विद्यापीठाने दबावाला बळी पडून सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवले ही असहिष्णुता नाही का? त्यामुळे योगेश सोमण यांच्यावर झालेल्या अन्यायावर मुंबई विद्यापीठाने समिती नेमून थिएटर अकादमीची गेल्या पाच वर्षाची सखोल चौकशी व्हावी. म्हणजे सत्य काय आहे ते विद्यार्थ्यांना कळेल."



"
गेले काही दिवसापासून देशात विद्यार्थ्यांना हाताशी धरून समाजात आणि शैक्षणिक संस्थेत असंतोष माजवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर घेऊन जाण्याचे प्रकार होत आहेत. स्वा. सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने सोयीस्करपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाने खपवून घ्यावी का? जर मुंबई विद्यापीठातील थिएटर अकॅडमीचे संचालक योगेश सोमण यांनी त्याबाबतीत परखड उत्तरे दिली म्हणून काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे नेते मुंबई विद्यापीठाला वेठीस धरून यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात, पोलिसांकडे जाऊन सोमण यांच्या विरोधात गांधी कुटुंबाचा घोर अपमान झाला म्हणून तक्रार करतात मग ही काँग्रेसची असहिष्णुता नाही का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

@@AUTHORINFO_V1@@