सीएएवरून विरोधकांची 'नाचक्की' ; शिवसेना राहणार बैठकीला गैरहजर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात सोमवारी दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. मात्र, यामध्ये विरोधकांमध्येच मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या या बैठकीला ममता बॅनर्जी, मायावती तसेच आपचे कोणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच, शिवसेनादेखील या बैठकीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सीएएवरून विरोधकांची चांगलीच नाचक्की झाली आहे.

 

सोमवारी दुपारी सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यासाठी काँग्रेसने बैठक आयोजित केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही बैठकीला उपस्थित राहणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यानतंर आम आदमी पक्षानेही बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेला या बैठकीचे निमंत्रणच नसल्याने त्यांनीदेखील पाठ फिरवली असल्याची चर्चा आहे.

@@AUTHORINFO_V1@@