काही लोकांना 'हिंदू' शब्दाचेच वावडे : उपराष्ट्रपतींची टीका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीबद्दल गदारोळ सुरु असताना आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 'भारतात काही लोकांना हिंदू या शब्दांचेच वावडे आहे,' अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईत श्री रामकृष्ण मठद्वारे आयोजित एका कार्यक्रमात व्यंकय्या नायडू बोलत होते.

 

"भारतातील काही लोकांना हिंदू शब्दाचे वावडे आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कोणत्याही एका धर्माचा अपमान करणे असा होत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे." असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले आहे. पुढे त्यांनी सांगितले की, "धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कोणत्याही धर्माचा तिरस्कार करणे असा होत नाही. धर्मनिरपेक्षता देशाच्या संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहे. देशाने नेहमी पीडितांना आश्रय दिला आहे. स्वामी विवेकानंद एक सामाज सुधारक होते. त्यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख करुन दिली. स्वामी विवेकानंदांनी एकदा सांगितले होते की, इतर देशांनी छळ केलेल्या नागरिकांना मोठ्या मनाने आश्रय देणाऱ्या देशाचा मी नागरिक आहे."

@@AUTHORINFO_V1@@