उत्तर प्रदेशमध्ये 'तान्हाजी' टॅक्स फ्री... महाराष्ट्रात कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : अजय देवगण आणि ओम राऊत यांचा 'तान्हाजी' या चित्रपटामुळे देशभरात वादळ उठले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. तसेच, आता हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे. यामुळे सर्वसामान्यांनादेखील हा चित्रपट प्रेक्षागृहात जाऊन पाहता येईल. यासंदर्भात पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने पाऊल उचलले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट कधी करमुक्त होणार? असाच प्रश्न विचारला जात आहे.

 

अधिक माहितीसाठी हेही वाचा -

 
 

'तान्हाजी' चित्रपटाला सोशल मीडियावर तसेच प्रेक्षागृहातदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ६२ कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरती हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये तयार केलेला हा तसा पहिलाच चित्रपट. याचसोबत प्रदर्शित झालेला 'छपाक' या चित्रपटाला साधारण प्रतिसाद मिळाला आहे. छपाकने आतापर्यंत ३ दिवसात फक्त १५ कोटींची कमाई केली आहे. पण, 'तान्हाजी' चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिस दणाणून सोडले आहे.

@@AUTHORINFO_V1@@