‘जेएनयु’तील उपस्थिती दीपिकाला भोवली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |

deepika_1  H x


‘छपाक’च्या अपयशानंतर दीपिकाच्या जाहिरातींवरही गदा?


मुंबई :
जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या टीव्ही वाहिन्यांवरील जाहिराती अचानक गायब झाल्या आहेत. दीपिकाने जेएनयूत जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे जाहिरात कंपन्या बॅकफूटवर गेल्या आहेत. त्यामुळे काही जाहिरात कंपन्यांनी दीपिकाच्या जाहिराती दाखवण्याचे प्रमाण कमी केले आहे. तर काही कंपन्यांनी वाद मिटेपर्यंत दीपिकाच्या जाहिराती प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जाहिरातदार कंपन्या आणि दीपिकाला त्याचा मोठा फटका बसणार आहे.


सध्या सुरु असलेल्या वादामुळे दीपिका असलेल्या जाहिराती कमी प्रमाणात दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे काही ब्रँड्सनी सांगितले आहे. तर अशा वादाच्या वेळी काय केले पाहिजे, याबाबत जाहिरातीच्या करारपत्रात एक क्लॉज असायला हवा, असे सेलिब्रिटींच्या मॅनेजर्सचे म्हणणे आहे. कोणताही ब्रँड जोखीम पत्करण्याच्या भानगडीत पडत नाही. कोणत्याही वादापासून दूर राहण्याचा ब्रँडचा प्रयत्न असतो, असे कोका कोला आणि अॅमेझॉनचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रँड्सचे मुख्य कार्यकारी शशी सिन्हा यांनी सांगितले.


दीपिका ब्रिटानियाच्या गुड डे, लक्स, लॉरियल, तनिष्क, विस्तारा आणि अॅक्सिस बँकेसहीत २३ ब्रँड्सच्या जाहिराती करते. या जाहिरातीतून होणारी तिची मिळकत तब्बल १०३ कोटी एवढी आहे. तिचे ट्विटरवर २.६८ कोटी फॉलोअर्स आहेत. एका चित्रपटासाठी ती दहा कोटी रुपये घेत असून, जाहिरातीसाठी ८ कोटी रुपये आकारते. मात्र सध्याच्या वादाचा फटका दीपिकाच्या जाहिरातींनाही बसला आहे. नेटकऱ्यांनी दीपिका विरोधात #दीपिका_हटाओ_LUX_बचाओ
म्हणत तिच्या कृत्याचा निषेध केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@