शरद पवारांचा उल्लेख जाणता राजा केलेला कसा चालतो? सुधीर मुनगंटीवारांची टीका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : 'आज के शिवाजी... नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून चाललेल्या वादावर भाजपसह नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेले कसे चालते?' असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. विशेष म्हणजे पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का?" या कठोर शब्दात त्यांनी विरोधकांना प्रश्न विचारला आहे.

 

"ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील माहित आहे. पण ज्याप्रमाणे मोदी देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे अनेक जटील प्रश्न त्यांच्याकडून सोडवले जात आहेत. यामुळेच विरोधकांकडून त्यांच्याबाबतीत गलिच्छ राजकारण केले जात आहे." असा आरोप त्यांनी केला.

 

"विरोधक राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा बांगलादेशविरोधातील युद्ध इंदिरा गांधींनी जिंकले, तेव्हा त्यांना दुर्गादेवीचा अवतार असे म्हंटले होते. इंदिरा गांधी कधीच दुर्गादेवीची बरोबरी करु शकत नाही हे माहिती होते. पण एखाद्या व्यक्तीचा गौरव करताना असे वक्तव्य अनेकदा केले जाते. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ असेही म्हणण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची 'जाणता राजा' ही शरद पवार यांना उपाधी देण्यात आली होती. शरद पवारांवर जाणता राजा नावाने पुस्तक निघाले. ३५ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या. मग शरद पवारांवरील पुस्तकाला जाणता राजा नाव का देण्यात आले ? ही उपाधी महाराजांशिवाय कोणालाही लागत नाही. जाणता राजा म्हणजे गावचा सरपंच नव्हे." अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीकास्त्र केली.

@@AUTHORINFO_V1@@