वाडिया बंद करण्यामागे पालिकेचा काही वेगळाच डाव? : ॲड. आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |

shelar_1  H x W


भाजपचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला सवाल


मुंबई : पालिकेकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्रसिध्द असलेले परळचे वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. अनुदानाअभावी रुग्णालय चालवणे कठीण झाल्याने नवीन रुग्णांना दाखल करून न घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर जुन्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे.







रुग्णालय वाचवण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून केली जात असतानाच, या मागे पालिकेचा काही वेगळाच डाव असल्याचा प्रश्न भाजपचे नेते आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित केला. प्रसूती आणि लहान मुलांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया रुग्णालयाची जमीन हडपण्याचा डाव असून, तो हाणून पाडण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिला आहे.

 

पालिकेतील सत्ताधारी आणि वाडिया यांच्यात जमीनीसंबंधी व्यवहाराचे षड्यंत्र रचले जात असल्यास त्याविरुद्ध कारवाई व्हावी. कुठल्याही राजकीय षड्यंत्राला बळी ना पडता, मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून आपण नव्वद वर्षे सर्वसामान्य मुंबईकरांची सेवा करणाऱ्या वाडिया रुग्णालयाला तातडीने पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात पुढाकार घ्यावा असे पत्र भाजपचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठविले आहे.

@@AUTHORINFO_V1@@