वाडिया रुग्णालय 'व्हेंटिलेटर'वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |

wadia_1  H x W:



मुंबई : पालिकेकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्रसिध्द असलेले परळचे वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. अनुदानाअभावी रुग्णालय चालवणे कठीण झाल्याने नवीन रुग्णांना दाखल करून न घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर जुन्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. रुग्णालय वाचवण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून केली जाते आहे.


प्रसूती आणि लहान मुलांवर उपचार यासाठी वाडिया ट्रस्टने पालिकेकडून भूखंड मिळवून ९० वर्षांपूर्वी वाडिया रुग्णालय सुरू केले. हे रुग्णालय वाडिया ट्रस्टचे असले तरी पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानावर त्याचा कारभार अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र पालिकेकडून दिले जाणारे सुमारे ९३ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. स्थायी समितीत नगरसेवकांनी मुद्दा लावून धरल्यानंतर प्रशासनाने यातील १४ कोटी रुपये वाडिया ट्रस्टला दिले. उर्वरित निधी कधी दिला जाणार याबाबत पालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक सुविधा देणे शक्य होत नाही आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही पैसे नसल्याने रुग्णालय चालवणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर रुग्णालय वाचवण्यासाठी मुंबई महापालिका व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेने एक केली आहे. याबाबत त्यांनी महापौरांना पत्रही दिले आहे. दरम्यान, रुग्णालय चालवण्यासाठी निधी नसल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद करण्यात आले आहे आणि जुन्या रुग्णांनाही डिस्चार्ज देण्यात येत असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@