रेवदंड्यात भरला पक्षीमित्रांचा मेळा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
tiger_1  H x W:


३३ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन


रेवदंडा (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील पक्षीमित्रांचा उत्सव समजल्या जाणाऱ्या ३३ व्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'ला शनिवारी अलिबागमधील रेवदंड्यात सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सुमारे पाचशे पक्षीमित्र संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत. पुढील दोन दिवस पक्षीमित्रांचा हा मेळा रेवदंड्यात मुक्काम करुन विविध कार्यक्रम आणि निसर्ग सहलींचा आनंद लुटणार आहे.
 
 
 
                                                                     संमेलनाध्यक्ष डाॅ. राजू कसंबे 
tiger_1  H x W: 
 
 
आक्षी किनाऱ्यावरील किनारी पक्षी कार्यशाळेने नांदी झालेल्या ३३ व्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'चा उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी पार पडला. रेवदंड्यामधील भंडारी समाज सभागृहात हे संमेलन पार पडत आहे. या संमेलनात पुढील दोन दिवसात पक्ष्यांवरील विविध मार्गदर्शन सत्र आणि पक्षीभ्रमंती सहली होणार आहेत. 'महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना', 'अमेझिंग नेचर' आणि 'ग्रीन वर्क्स ट्र्स्ट' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या उद्धाटन समारंभाला उद्घाटक म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ. विजय सुर्यवंशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये उपस्थित होते. तर संमेलनाचे माजी अध्यक्ष वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे, आजी अध्यक्ष पक्षी अभ्यासक डाॅ. राजू कसंबे आणि पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डाॅ. जयंत वडतकरांची उपस्थितीही लाभली होती. यावेळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष किशोर रिठे यांनी संमलेनाच्या अध्यक्षपदाची धुरा डाॅ. कसंबेंकडे सोपवली.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
उद्धाटन कार्यक्रमापूर्वी पाहुण्यांनी वर्धा आणि नाशिकवरुन आलेल्या सायकल स्वार पक्षीमित्रांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमामध्ये संघटनेतर्फे प्रथमच जाहिर केलेल्या पक्षीमित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक बाळासाहेब कुलकर्णींना जीवनगौरव पुरस्कार, मुकुंद धुर्वेंना पक्षीसंवर्धन व सुश्रृषा पुरस्कार आणि अश्विन पाटील व प्रशांत वाघ यांना पक्षीसंशोधन व जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी चार पुस्तकांचे प्रकाशन सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी पार पडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये वनाधिकारी सुनील लिमये यांची मुलाखत विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी त्यांनी भविष्यातील पक्षीसंवर्धनाच्या विविध बाबींवर भाष्य केले. रविवारी संमेलनाची सुरुवात रेवदंडा किनाऱ्यावर पक्षी भ्रमंती सहलीने होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@