देशविरोधी घोषणा देणार्‍यांची रवानगी तुरुंगात : गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
Amit Shah _1  H

जबलपूर : "देशविरोधी घोषणा देणार्‍यांची रवानगी आता थेट तुरुंगात करण्यात येईल," असा सज्जड इशारा रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करून हिंसाचार घडविणार्‍या विरोधकांना रविवारी त्यांनी खडेबोल सुनावले.

 

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची जाहीर सभा झाली. यावेळी जेएनयुमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा कायदा, कलम ३७० रद्द करणे, एनआरसी आदी मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केले. जेएनयुमधील आंदोलनावरही शाह यांनी भाष्य केले. "जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणा देणार्‍यांना तुरुंगात टाकायला हवे की नको," अशी विचारणा त्यांनी सभेला उपस्थित असणार्‍या जनतेला केली. त्यानंतर,"राष्ट्रविरोधी घोषणा देणार्‍यांना तुरुंगात टाकले जाईल," असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशविरोधी घोषणा देणार्‍यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत," असेही शाह म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले की, "कितीही विरोध करा, पण आम्ही सर्वांना नागरिकत्व देणार आहोत. भारतावर जितका अधिकार माझा आणि तुमचा आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींचा आहे," असे शाह म्हणाले. "काँग्रेस नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहे. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना मी आव्हान देतो की, त्यांनी या कायद्यात नागरिकत्व हिरावून घेणारी एखादी तरतूद तरी आहे का?, हे शोधून दाखवावे. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, नागरिकत्व हिरावून घेणारा नाही," असे शाह म्हणाले. "व्होटबँकेच्या राजकारणामुळे हे सर्व विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.



@@AUTHORINFO_V1@@