साहित्य संमेलनात सावरकरांची बदनामी करणाऱ्यांचा निषेध नाहीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |

veer_1  H x W:

 

धाराशिव : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, भाषाप्रभू, मराठी भाषेत अभिजात वाड्मयनिर्मिती करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेस-सेवादलाने आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर पुस्तिकेच्या माध्यमातून प्रकाशित केला होता. माजी संमेलनाध्यक्ष सावरकर यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेस-सेवा दलाचा निषेध करावा अशा मागणीचे निवेदन समस्त उस्मानाबादकरांच्या वतीने संमेलनाच्या आधीच दिले होते. परंतु, आयोजकांना त्याची आठवण राहिली नाही व स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अश्लाघ्य मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांविषयीचा उल्लेखदेखील ठरावात करण्यात आला नाही.


स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत घृणास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. ही पुस्तके काँग्रेसकडून वितरित केली गेली होती. या घृणास्पद कृत्याच्या विरोधात उस्मानाबाद येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव मांडण्याबाबत स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांना निवेदन देण्यात आले होते.

    साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आलेले ठराव

· दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली

· शेतकरी समस्या, केंद्र आणि राज्य सरकारची अनास्था

· मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा

· मराठी भाषेची इंग्रजीकडून गळचेपी थांबविण्यासाठी सीबीएससीसारखी

· महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठीची सक्ती करणे.

· मराठी शाळा वाचविण्यासाठी कृती समितीची नियुक्ती

· मराठी एककीकरण समितीच्या कर्नाटक भाषिक समितीचा निषेध

· फुलेंच्या पहिल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर करणे



@@AUTHORINFO_V1@@