तानाजी करमुक्त झालाच पाहीजे : सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |

Tanhaji _1  H x


 


मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवरायांचे खंदे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी माजी अर्थमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर आधारित 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी करत आहे, भाजपकडून या चित्रपटाला करमुक्त करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे.

 

 

"तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्‍ठ मित्र आणि वीर निष्‍ठावान मराठा सरदार होते. तानाजी सारख्‍या वीर योध्‍द्याच्‍या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आजच्‍या पिढीसाठी प्रेरणादायी असा आहे. 'आधी लगीन कोंडाण्‍याचे मग रायबाचे', असे म्‍हणत युध्‍दाला सामोरे जाणारे तानाजी आमच्‍या श्रेष्‍ठ मराठी संस्‍कृतीचा मानबिंदु आहे. या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांची प्रचंड पसंती सुध्‍दा मिळत आहे. या चित्रपटाला करमुक्‍त करुन शासनाने या वीर योध्‍द्याला मानवंदना द्यावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्‍याकडे केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@