हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
JET _1  H x W:



केंद्र सरकार लवकरच २०० फायटर जेट्स खरेदी करणार


कोलकाता : "भारतीय वायुदलाची कमकुवत झालेली शक्ती भरून काढण्यासाठी २०० लढाऊ जेट विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे," अशी माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी रविवारी येथे दिली. "८३ हलक्या, अत्याधुनिक ‘तेजस मार्क-१’ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससोबतचा करार अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त ११० विमाने खरेदीच्या प्रस्तावावर इच्छापत्र जारी करण्यात आले आहे. सुमारे २०० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे," असे त्यांनी सांगितले. "८३ तेजस विमानांच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

 

या माध्यमातून भारताची तातडीची निकड दूर केली जाईल," असे त्यांनी तटरक्षक दलाच्या एका नौकेच्या जलावतरण कार्यक्रमात सांगितले. "तेजस विमानांच्या खरेदीचा करार या वर्षातच होईल. ही प्रक्रिया लवकर पार पाडली जाईल," असे त्यांनी कालमर्यादेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. "हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ‘तेजस’ची उत्पादन क्षमता वार्षिक आठ विमानांवरून सोळा विमानांवर करीत आहे. गरज भासल्यास ही क्षमता आणखी वाढवली जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

भारतीय हवाई दलात सध्या मिराज २०००, सुखोई ३० एमकेईआय आणि मिग-२९ यासारखी लढाऊ विमान आहेत. याशिवाय जॅग्वार आणि मिग २१ बायसन यांचाही समावेश आहे. परंतु, ही विमाने आता काळाच्या ओघात जुनी झाली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा विमाने खरेदी करण्यात येणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@