"चित्रपटाला पैसे दिले नसल्याने अनुरागचा मोदीद्वेष"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
Anurag Kashyap _1 &n


 

अखिलेश सरकारने दिले होते यापूर्वी अनूदान, पत्रातील माहिती


 

नवी दिल्ली : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यप याचा मोदीद्वेष हा त्याच्या चित्रपटासाठी अनुदान मिळणे बंद झाल्यामुळे उफाळून येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते ताजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विट करत अनुरागने यापूर्वी मागितलेल्या चित्रपटांसाठीच्या अनुदानाची पत्रके जाहीर केली आहेत. सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांवर सतत भाजपविरोधात टीका करणाऱ्या अनुरागवर आता भाजपतर्फे प्रतिहल्ला करण्यात आला आहे.

 

तत्कालीन उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकारने मसान या चित्रपटासाठी दोन कोटींचे अनुदान दिले होते. आत्ताच्या सरकारकडून त्याने सांड की आँख आणि मुक्केबाज या चित्रपटासाठी अनुदानासाठी अर्ज केला होता. मात्र, योगी सरकारने या चित्रपटांसाठी अनुदान देण्यास नकार दिला. त्यामुळे हा विरोध होत असल्याचा थेट आरोप बग्गा यांनी केला आहे.



 

बग्गा यांनी तीन पानी पत्र जाहीर केले आहे. या पत्रात अनुराग कश्यपने सदस्य सचिव, माहिती जनसंपर्क विभाग, उत्तर प्रदेश सरकार आदींना दिले आहे. पहिल्या पत्रात म्हटल्यानुसार डिसेंबर २०१४ मध्ये सरकारने १ मार्च २०१५ रोजी २ कोटी रुपये देण्याची शिफारस केली होती. मसान चित्रपट निर्मितीसाठी एकूण ८ कोटींचा खर्च झाला, याचे ९७ टक्के चित्रीकरण हे उत्तर प्रदेशमध्ये झाले. त्यामुळे एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम ही अनुदानाच्या स्वरूपात मिळावी, असा अर्ज करण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने ही रक्कम त्याला दिली. त्यानंतर सांड की आँख चित्रपटासाठीही अशीच मागणी केली होती. मात्र, धोरणानुसार चित्रपटाचे चित्रिकरण झाला नसल्याने सरकारने हे अनुदान नाकारले आहे.



@@AUTHORINFO_V1@@