'त्या' १७६ प्रवाशांचे विमान आमच्याकडून चुकून पडले ; इराणची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 

 

नवी दिल्ली : युक्रेनला जाणारे विमान चुकीने पाडल्याचे इराणने मान्य केले आहे. मानवी चुकांमुळे हा अपघात घडल्याचे इराणच्या लष्कराने मान्य केले आहे. याबाबतचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे. युक्रेनचे प्रवासी विमान इराणची राजधानी तेहरानजवळ ८ जानेवारीला कोसळले होते. तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळाजवळच विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व १७६ जणांचा मृत्यू झाला होता.

 

बोईंग कंपनीचे विमान उड्डान घेतल्यानंतर थोड्याच वेळात तेहरानच्या जवळ असलेलय परांद या भागात कोसळले होते. या विमानामध्ये ८२ इराणी, ६३ कॅनडाचे नागरिक असल्याची माहिती युक्रेनच्या मंत्र्यांनी दिली होती. युक्रेनचे आंतरराष्ट्रीय विमान फ्लाईट ७५२ स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.१५ ला तेहरान विमानतळावरून उड्डाण घेणार होते. मात्र, एक तास उशिराने विमानाने उड्डाण घेतले होते. युक्रेनची राजधानी कीव येथील बोरीसपील विमानतळावर हे विमान उतरणार होते, मात्र, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात ते कोसळले होते.

@@AUTHORINFO_V1@@