'हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हल्ल्याची शक्यता' : कुलगुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


JNU_1  H x W: 0


नवी दिल्ली : कुलगुरू एम जगदीश कुमार यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर शनिवारी प्रथमच विद्यार्थ्यांची भेट घेतली. ते म्हणाले की, निष्पाप विद्यार्थ्यांना इजा होऊ नये म्हणून यापूर्वीच विद्यापीठाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांशी बोलताना कुलगुरू म्हणाले की, काही विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दहशत इतकी पसरविली होती की आमच्या काही विद्यार्थ्यांना भीतीपोटी वसतिगृह सोडावे लागले. गेल्या काही दिवसांत आम्ही विद्यापीठाची सुरक्षा वाढविली आहे जेणेकरुन निष्पाप विद्यार्थ्यांना इजा होऊ नये. कुलगुरूंनी असेही म्हटले, ही एक मोठी समस्या आहे. बरेच बेकायदेशीर विद्यार्थी वसतिगृहांमध्ये रहात आहेत, ते बाहेरील असू शकतात आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात ते भाग घेऊ शकतात ज्याचा विद्यापीठाशी काही संबंध नाही.



जेयूयूमध्ये १३ जानेवारीपासून नियमित तासिका सुरू होतील


जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक एम. जगदीश कुमार म्हणाले की
, हिवाळी सत्रात १ जानेवारीपासून वर्ग सुरू होतील. आवश्यक असल्यास, हिवाळ्यातील सेमिस्टर नोंदणीमध्ये अर्ज करण्याची तारीख वाढविली जाईल. सध्या १२ जानेवारीपर्यंत विद्यार्थी नोंदणी करु शकतात. या व्यतिरिक्त २०जानेवारीपर्यंत लेट शुल्कासह नोंदणी करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवून वर्गात उपस्थित राहण्याचेही आवाहन त्यांनी केले.



जेएनयूचा प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारचे उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांच्यासह कुलगुरू प्रो. एम. जगदीश कुमार आणि कुलसचिव प्रो. प्रमोद कुमार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठात सुरु असणाऱ्या आंदोलनांवर तोडगा काढणे आणि शैक्षणिक दिनदर्शिकेत वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उच्च शिक्षण सचिवांनी कुलगुरू व कुलसचिव यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करुन समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. कारण विद्यार्थी आणि शिक्षकांशी बोलण्यावर तोडगा निघेल. सरकारचे निर्देश आहेत की विद्यापीठ प्रशासनाची पहिली प्राथमिकता आंदोलन संपविणे आहे. यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.



कुलगुरू म्हणाले की
, ११ डिसेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, यापुढे उपयोगिता आणि सेवा शुल्क विद्यार्थ्यांना द्यावे लागणार नाही. या संदर्भात गुरुवारी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे. युजीसी युटिलिटी आणि सर्व्हिस चार्ज पैसे विद्यापीठाला देईल. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात युजीसीला यापूर्वीच पत्र लिहिले होते.

@@AUTHORINFO_V1@@