दोन दिवसीय दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी कोलकात्यात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


mamata_1  H x W


कोलकाता : सीएए आणि एनआरसीबाबत पश्चिम बंगालमध्ये तीव्र आंदोलने होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता येथे पोहोचले आहेत. पंतप्रधानांच्या या पश्चिम बंगाल भेटीला भारतीय विद्यार्थी महासंघाने विरोध दर्शविला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान कोलकाता बंदरगाह ट्रस्टच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित राहतील.






राजभवन येथे मुख्यमंत्री ममता यांच्यासमवेत बैठक

 

संध्याकाळी पीएम मोदी आणि ममता बॅनर्जी यांची राजभवनात भेट होणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ठरलेल्या वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास कोलकाता येथे पोचल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होईल. परंतु, बैठकीचा अजेंडा मात्र अधिकाऱ्यांनी जाहीर केला नाही.






राजभवन परिसरात कलम १
४४ लागू

 

विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचा अंदाज घेता प्रशासनाने राजभवनाच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. राजभवन आणि विमानतळाभोवती मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने राजभवनला जाणार आहे विमानतळ ते राजभवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता त्यांच्यासाठी अडथळा ठरला आहे. संपूर्ण रस्त्यावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@