केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ : लष्करप्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


POK_1  H x W: 0



नवी दिल्ली : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शनिवारी दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी आगामी काळात सैन्याबद्दल आपली दूरदृष्टी सांगितली. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात सैन्याच्या संख्या नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जाईल . मग ते सैन्यासाठी उपकरणे खरेदी करणारे असो किंवा सैन्य भरती असो."


भविष्यात पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचा भाग होऊ शकतो
, असा ठाम विश्वास लष्करप्रमुखांनी आज व्यक्त केला.पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचे नरवणे म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई करत पाकचे मनसुबे उधळून लावण्यात भारताला यश येत असल्याचेही नरवणे यांनी सांगितले



संसदेकडून आदेश येताच पाकव्याप्त काश्मीर आपले असेल


पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) भारतात समाविष्ट करण्याबाबत टिप्पणी करताना सेना प्रमुख म्हणाले
, "संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संसदीय ठराव आहे." संसदेला ते क्षेत्र (पीओके) देखील भारतात असावे असे वाटत असेल तर आम्हाला या संदर्भात आदेश आल्यास आम्ही त्वरित योग्य कारवाई करू.



उत्तरेकडील सीमेवरील आव्हाने पेलण्याची तयारी आहे


चीनने सीमाभागातील सैन्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासंदर्भात लष्करप्रमुख नरवणे म्हणाले की
, आम्ही उत्तर सीमेवर उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यास तयार आहोत. प्रगत शस्त्रास्त्र यंत्रणा तैनात करण्यासह आम्ही उत्तरेकडील सीमेवर तयारीचे पुनर्बांधणी सुरू केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@