... असे झाले नाही तर 'छपाक'वर होणार कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दीपिकाची जेएनयूमधील उपस्तिथीमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यातूनही हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु, आता पुन्हा एकदा हा चित्रपट सिनेमागृहातून काढण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. यावेळी उच्च न्यायालयाने आता असे आदेश दिले आहेत की, अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्ण भट्ट यांना चित्रपटात श्रेय न दिल्यास १५ जानेवारीनंतर हा चित्रपट दाखवता येणार नाही.

 

काय आहे हे प्रकरण?

 

दीपिका पदुकोणचा बहुचर्चित चित्रपट 'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित आहे. यावेळी त्यांच्या सोबत लढा देणाऱ्या त्यांच्या वकील होत्या अपर्ण भट्ट. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर निर्मात्यांनी लक्ष्मी अग्रवाल यांना श्रेय दिले. मात्र, त्यांनी त्यांच्या वकील अपर्ण भट्ट यांचा उल्लेखदेखील केला नाही. याचसंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केले.

 

माहितीसाठी घेण्यासाठी वकिलांची भेट... मग श्रेय का नाही? उच्च न्यायालयाचा निर्मात्यांना सवाल

 

अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा सिंग यांच्याकडून घटनेची माहिती घेतली गेली. परंतु त्यांना चित्रपटात श्रेय का देण्यात आलं नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना केला होता. "मी अनेक वर्षे लक्ष्मी अग्रवाल यांच्या बाजूने न्यायालयात खटला लढवला आहे. चित्रपट तयार करताना स्क्रिप्ट तयार करण्यातही मदत केली होती. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचे श्रेय देण्यात आले नाही." असे भट्ट यांनी न्यायालयाला सांगितले होते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा 'छपाक' चित्रपटावर गदा येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@