प्रेक्षकांची छपाककडे 'पाठ', तर तान्हाजी ब्लॉकबस्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. बऱ्याच प्रेक्षकांनी ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित 'तान्हाजी'ला चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईसह देशभरात तान्हाजी चित्रपटाचे शोज हाऊसफुल जात असल्याचे चित्र दिसत होते. तर, छपाकला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याचे कारण चित्रपटाला मिळालेली 'बॅड पब्लिसिटी' कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

जेएनयू हजेरी पब्लिसिटी स्टंट, त्यानंतर लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्ण भट्ट यांचे आरोप यामुळे चित्रपटावर चांगला परिणाम झाला. तर, तान्हाजी चित्रपटाचे चांगले प्रमोशन कमाईच्या बाबतीत कमी आले. पहिल्या दिवशी छपाक चित्रपटाने फक्त ४.५ कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे 'तान्हाजी' चित्रपटाने तब्बल १६ कोटींची कमाई केली आहे. छपाक चित्रपटाची कथा जरी चांगली असली चुकीच्या प्रमोशन फंड्यामुळे या चित्रपटाने मार खाल्ला.

@@AUTHORINFO_V1@@