आजपासून देशभरात लागू नागरिकत्व सुधारणा कायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : ११ जानेवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारने १० जानेवारीला अधिसूचना जारी करुन कायदा लागू झाल्याची अधिसूचना केली. यामध्ये गृह मंत्रालयाने सांगितले आहे की, "केंद्र सरकार जानेवारी २०२०च्या १० व्या दिवशी नागरिकत्व कायदा लागू झाल्याचे निश्चित करत आहे." राजपत्रात प्रकाशित झालेले कायदे अधिकृत घोषणा मानले जातात.

 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. १२५ विरूद्ध १०५ च्या फरकाने राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. नंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले.

@@AUTHORINFO_V1@@