प्रत्येक विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक पोलीस ठाणे उभारावे : सुब्रह्मण्यम स्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


subrahmanian_1  


अहमदाबाद : गेल्या काही दिवसात विद्यापीठांमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.अहमदाबादच्या इंडस विद्यापीठाच्या एका कार्यक्रमानंतर स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सुरक्षेचा अर्थ प्रत्येक कॅम्पसमध्ये एक पोलीस ठाणे उभारले गेले पाहिजे. तु्म्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. त्यात खूप वेळ जातो. देशातील विद्यापीठांमध्ये पोलीस ठाणे उभारले जाणे आवश्यक आहे. हे केवळ जेएनयूसाठी बोलत नाही, पण त्याची सुरुवात जेएनयूमधूनच करायला हवी,' असेही स्वामी म्हणाले.





ते म्हणाले कि
, विद्यापीठांमध्ये सुरक्षित वातावरण असावे याकरिता प्रत्येक कॅम्पसमध्ये एक पोलीस ठाणे उभारून तेथे बीएसएफ किंवा सीआरपीएफ तैनात करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. जेएनयू दोन वर्षांसाठी बंद करून आवश्यक पावले उचलावीत आणि त्यानंतर पुन्हा ते खुले करण्यात यावे. जेएनयूचे नामांतर सुभाषचंद्र बोस विद्यापीठ करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

@@AUTHORINFO_V1@@