Exposed : वाचा 'छपाक'च्या प्रमोशनसाठी कसं रचण्यात आला 'दीपिका-जेएनयू'चा स्टंट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |
Deepika 1 _1  H
 



'देअर इज नो सच थिंग ऍज बॅड पब्लिसीटी'... अभिनेत्री दिपीका पदूकोण 'जेएनयुत' गेली. शिक्षण बंद पाडणाऱ्या वामपंथींसोबत उभी राहीली आणि काही मिनिटांतच 'I Support Deepika' या मोहिमेत लाखो करोडो सोशल मीडिया अकाऊंटवर 'छपाक'च्या समर्थनात पोस्टर झळकू लागले. 'आता छपाक पाहणारच!'. 'दीपिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तिला वाटेल ती भूमीका ती घेऊ शकते', अशा समर्थनाच्या आरोळ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागल्या आणि ज्यांना छपाक या चित्रपटाची पार्श्वभूमी काय ही माहीतीच नाही, त्यांनाही या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही समजली.


Deepika 1 _1  H

 

 

आता मी हा सिनेमा पाहणारच, असे समर्थनही सोशल मीडियावर दिसू लागले. हा प्रकार सहज घडून गेला का? तर याचे उत्तर तुम्हाला दीपिकाच्या जेएनयुतील फोटोवरून दिसून येईल. हे सारंकाही यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे होती दीपिकाच्या चित्रपटाचे प्रमोशन करणारी 'पीआर' कंपनी.  'छपाक' एका अॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या समस्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा... चित्रपटात एका नाजूक आणि सामाजिक विषयाला हाताळण्याचा दिग्दर्शकाचा यशस्वी प्रयत्न आणि दीपिकाचा अभिनय हा वाखाणण्या जोगा मात्र, चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वापरलेला हा हातखंडा भल्याभल्यांना न जमणारा आहे.


Deepika 1 _5  H

 

 

नेमकं झालं काय होतं ?

सारेकाही घडवून आणले होते का ? , असा या नाट्यमय घडामोडीला संशयाचा वास नक्कीच येत राहील. देशात जामिया विद्यापीठातील हिंसाचार, हैदराबाद बलात्कार प्रकरण आदी प्रकरणे प्रसार माध्यमांसमोर गाजत असताना 'छपाक'चे प्रमोशन करणे अवघड होते. चित्रपटाचे प्रमोशन करणारी पीआर कंपनी यांनी हे सुनियोजित नाट्य रचले. जेएनयूत झालेल्या हिंसाचाराचा प्रकारच सर्व ठिकाणी चर्चेत असताना आणि देशभरातील प्रसारमाध्यमे जेएनयूच्या आखाड्यात असतानाच कंपनीने थेट दिपीकालाच जेएनयूमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. या पीआर कंपनीच्या फोटोग्राफर्सना आधी तिथे पाठवण्यात आले. दीपिकाने जेएनयूत प्रवेश केला. कथित तुकडे तुकडे गॅंगच्या नेत्यांसमोर उभे राहून त्यांची भाषणे ऐकली. ही तिच मंडळी होती. ज्यांनी जेएनयूत नव्याने सुरू होणारे अभ्यासक्रम आणि त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रीया हिंसाचार करून बंद पाडली होती. या प्रकाराचे फोटो सर्व प्रसिद्धी माध्यमे, ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर या पीआर एजन्सीने पाठवले. प्रसिद्धी माध्यमांनी तर या फोटोला पीआर एजन्सीचे सौजन्यही दिले होते.


Deepika 1 _4  H

 

 

अशी मिळत गेली फुकटची प्रसिद्धी

अवघ्या काही क्षणात सोशल मीडियावर दीपिका आणि फक्त दीपिकाच दिसत होती. तिच्या समर्थनार्थ लाखोलोकांनी पोस्ट करत मी चित्रपट पाहणारच, अशी फोटोओळ शेअर करत अनेकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. काहींनी तिच्या पेहेरावावरून वर्णन करण्यास सुरुवात केली होती. फोटोचा प्रभाव आणि त्याला देणारी प्रसिद्धी मिळवण्यात ही पीआर कंपनी यशस्वी ठरली. दीपिकाचा चित्रपट लाखो करोडो कमावेल. शंभर कोटींच्या क्लबमध्येही पोहोचेल. मात्र, दीपिका ज्या जेएनयूतील डाव्यांसोबत उभी होती, त्यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात विरोध केला आहे. कित्येक नव्याने सुरू होणारे प्रवेश बंद पाडले आहेत. ज्यांनी शिक्षणासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या परिवारापासून दूर जात जेएनयू गाठलं होतं. शिकून देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी काहीतरी धडपड करणाऱ्यांच्या विरोधात दीपिका का उभी होती ? फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच ?

 
 

Deepika 1 _2  H 
 
@@AUTHORINFO_V1@@