धोनी होणार निवृत्त? रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : भारताचा यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी आणि त्याची कारकीर्द सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या निवृत्तीच्या बातम्या सतत प्रसार माध्यमांमधून निवृत्तीच्या बातम्या येत असतात. आता पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून धोनी खरंच निवृत्त होत आहे का असा सवाल पुन्हा विचारला जात आहे.

 

प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले कि, "धोनी अनेक वर्ष क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर या वयात तो टी-२० खेळणे पसंत करेल. पण त्यासाठी त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागणार आहे." सध्या महेंद्र सिंग धोनी हा क्रिकेटपासून लांब आहे. पण, लवकरच तो मैदानावर उतरेल अशी अपेक्षा धोनीचे चाहते करत आहेत. तसेच, निवृत्तीबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया त्याने दिलेली नाही.

@@AUTHORINFO_V1@@