जेएनयूत तोडफोड करणाऱ्या नऊ जणांची ओळख पटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |
JNU 2 2 _1  H x


जेएनयू विद्यार्थी संघटना अध्यक्षांह माजी विद्यार्थ्यांचा सामावेश


 
नवी दिल्ली : जेएनयूमध्ये सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोष यांच्यासह माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन या डाव्या संघटनांच्या प्रतिनिधींचा त्यात सामावेश असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

 

 

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. जेएनयूमध्ये रविवारी रात्री सर्व्हर रूमवर हल्ला झाला. या हल्ल्यात या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याच आढळून आल आहे. जेएनयूच्या हिंसेबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आल्याच गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी म्हटले. 'एसएफआय', 'एआयएसए', 'एआयएसएफ' आणि 'डिएसएफ' आदी विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थांना नोंदणी करण्यापासून रोखले होते. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.



@@AUTHORINFO_V1@@