नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |


चंद्रग्रहण _1  


नवी दिल्ली : २०२०या नववर्षातील पहिले चंद्रग्रहण १० जानेवारीच्या रात्री पाहिले जाईल. हे ग्रहण संपूर्ण भारत तसेच युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळेल. त्याचा एकूण कालावधी चार तास एक मिनिट असेल. चंद्रावर पृथ्वीची उपछाया पडणार असल्याने हे चंद्रग्रहण 'पेनुंब्रल' या प्रकारचे आहे. त्यामुळे खग्रास चंद्रग्रहणात चंद्रबिंब लाल-तपकिरी दिसते, तसे या चंद्रग्रहणात दिसणार नाही. चंद्र पृथ्वीच्या उपछायेने झाकोळला गेल्यासारखा दिसेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण १० जानेवारीला रात्री १० :३७ वाजता सुरू होईल आणि ११ जानेवारीला २.४२मि. ने संपेल. मध्यरात्री १२.४१ मि. ने चंद्र पृथ्वीच्या उपछायेने ९० टक्के झाकोळलेला दिसेल.



यंदाच्या वर्षात एकूण सहा ग्रहण
; तीन देशातून दिसणार


मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जीवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्र प्रकाश गुप्ता म्हणाले की
, यावर्षी सहा ग्रहण लागतील परंतु त्यापैकी केवळ तीनच देशामध्ये दिसतील. या सहापैकी चार ग्रहण चंद्र आणि दोन सूर्यग्रहण असतील. प्रथम चंद्रग्रहण शुक्रवार आणि शनिवारी (१० -११जानेवारी) च्या मध्यरात्री दिसतील , जे केवळ देशातील काही राज्यातून दिसेल.



हे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री १० .३६ वाजता सुरू होईल आणि शनिवारी पहाटे २ .४४ पर्यंत सुरू राहील. याखेरीज दुसरे चंद्रग्रहण पाच आणि सहा जूनच्या मध्यरात्री आहेत ते भारतातून दिसेल
, तर जुलै आणि नोव्हेंबरला असणारे चंद्रग्रहण दिसणार नाही. २१ जून रोजी असणारे सूर्यग्रहण भारतात दिसेल.१४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार असून ते भारतातून दिसणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@