शांततेच्या ‘नोबेल’ पुरस्कारासाठी मी पात्र : डोनाल्ड ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |

trump_1  H x W:


वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या चित्र-विचित्र वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. सध्या अमेरिकेत यंदाच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकींच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अमेरिकेत प्रचार सभा सुरु असून, इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला अमेरिकेने ठार केल्याने डोनाल्ड ट्रम्प हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारातही उपस्थित करत आहेत. ट्रम्प म्हणाले, सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवले आहे. त्यामुळे शांततेच्या नोबेलसाठी माझी निवड केली पाहिजे. या कामगिरीमुळे मी या पुरस्कारासाठी पात्र आहे असेही ते म्हणाले.


ट्रम्प पुढे म्हणाले
, मला आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेला नाही. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले यावेळी माझी निवड झाल्यास ती योग्य ठरेल. तर डेमोक्रॅटिक पक्षाने सुलेमानीला टार्गेट करण्याच्या निर्णयावरून ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.


इराणने अमेरिकेच्या इराकमधल्या तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केला. या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांचे आणि लष्करी तळांचे नुकसान झालेले नाही. अमेरिकेचा एकही सैनिक जखमी झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@