पोप ते फादर : रिलीजिअस मिरॅकल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020   
Total Views |

japa_1  H x W:



हा जमावजमला होता, त्यावेळी तिने म्हटले, “धर्मगुरू महाशय, एक पापी द्या.” त्यावर धर्मगुरूने म्हटले, “पापी देतो, पण तू चावणार तर नाहीस ना?” असे म्हणून त्यांनी तिच्या गालाची पापीही घेतली. ती हर्षोन्मादाने वेडी झाली. सगळा जमाव आनंदित झाला. थांबा, ही काही काल्पनिक घटना नाही. तर नेहमीच ‘मिरॅकल’ म्हणजे जादूच्या दुनियेत वावरणार्‍या चर्च संस्कृतीतली विहंगम अलौकिक घटना आहे. पोपचे पवित्र चुंबन मागणारी तीसुद्धा ननच होती. आता काही म्हणतील, तुमच्या ना नजराच वाईट, कुठल्याही घटनेचा संबंध तुम्ही ‘पाप’कर्माशीच लावणार. जुन्या वळणाचे, बंद संस्कृतीचे कुठले!! पण, थांबा. असे काही म्हणू नका. कारण पोपचे चुंबन मागण्यामागे त्या ननची श्रद्धा होती आणि ‘चावणार तर नाहीस ना,’ असे विचारण्यामागेही पोप फ्रान्सिस यांचा प्रेमळ आशीर्वादच होता. यावर आमची श्रद्धा आहे. तसेही पोप यांचे एक स्मितहास्य, हस्तांदोलन, पापी मिळणे म्हणजे पापातून मोक्ष मिळणे होय. ही श्रद्धा जगभरच्या ख्रिस्ती बांधवांमध्ये आहे.


पोप यांचा आशीर्वाद तर सोडाच, गल्लीबोळातले पाद्री, पाश्चर यांच्याकडेही अलौकिक शक्ती असते म्हणे. त्यांना ते ‘रिलीजिअस मिरॅकल’ म्हणतात. हे असे ‘रिलीजिअस मिरॅकल’ केले म्हणून कितीतरी महानुभावांना रोमन कॅथलिक चर्चतर्फे ‘संत’ पदवी बहाल केली जाते. रोमन कॅथलिक चर्चने जाहीर केलेल्या या संतत्वाच्या कथा तर फारच रोमांचकारी आहेत. कुणाला आणि का संतत्व मिळाले, याचा मागोवा घेतला, तर डोळ्यासमोर काजवेच चमकतील. जादू हो, जादूमुळे काजवे चमकतील!!!


असो, संतत्व कुणाला? धर्मगुरू कोण? यांची पौर्वात्य आणि पाश्चिमात्य स्तरावर समानता होऊच शकत नाही. असे जरी असले तरी मानवी जीवनाला सत्याची प्रेरणा द्यावी. किमान मानवी सत्याची ओळख व्हावी, हे कोणत्याही संस्कृतीचे आणि कोणत्याही धर्मपंथाचे आद्य कर्तव्यच आहे. या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य संस्कृतीची धरोहर म्हणून ख्रिस्ती धर्माकडे आणि त्यातील ‘रिलीजिअस मिरॅकल’कडे पाहिले तर? तर, चिकित्सकांच्या नजरेत प्रश्नचिन्हच उमटतात. गल्लीबोळात पाद्रींनी केवळ चर्चचे पवित्र पाणी पाजून मरणप्राय रुग्णांना बरे करतो, असे म्हणणे किंवा जंगी प्रार्थनासभा लावून तिथे ख्रिश्चन सोडून इतर धर्माच्या मुख्यतः निरक्षर आणि तितक्याच अज्ञानी भोळ्या लोकांचा मेळावा भरवणे. स्थानिकांच्या भाषेतून, स्थानिकांच्या श्रद्धास्थानाच्या जागी दयाळू येशूबापाला अधोरेखित करणे. तसे करून ईप्सित हेतू साध्य करणे. तो हेतू म्हणजे हे भोळेभाबडे ‘परधर्मीय’ येशू बापाच्या छत्राखाली चर्चच्या मायेखाली आणणे. याला काही नतद्रष्ट लोक ‘धर्मांतर’ म्हणतात. पण, तसे म्हणायचे नसते, कारण ते ‘रिलीजिअस मिरॅकल’ आहे ना! या ‘रिलीजिअस मिरॅकल’चा वारसा गल्लीबोळातल्या फादरना रोमच्या पोप फ्रान्सिसकडूनच मिळालेला आहे.


पोप यांनीही असे ‘रिलीजिअस मिरॅकल’ केलेले आहेत. त्यांचे श्रद्धाळू लिहितात की, एका महिलेला पॅरालिसिस होता, पण पोप फ्रान्सिस यांच्या केवळ स्मितहास्याने ती बरी झाली, तर एका बाळाच्या हृदयाला दोन छिद्रे होती. पण, पोप फ्रान्सिस यांनी त्या बाळाला स्पर्श करताच त्यापैकी एक छिद्र बंद झाले आणि दुसरे बारीक झाले. वा...वा! काय जादू. कशाला हवेत डॉक्टर आणि त्यांच्या त्या डिग्य्रा. पण, तसा विचार करायचा नसतो. कारण, ‘रिलीजिअस मिरॅकल’ असते ना...


रोमन कॅथलिक चर्च संतत्व बहाल करते. त्यासाठी दोन सॉलिड जादू कराव्या लागतात. त्या दोनपैकी अर्धी जादू पोप फ्रान्सिस यांच्या नावावर आहे. तिसर्‍या शतकात सेंट जेनारो यांचा मृत्यू झाला. त्यांचे रक्त नेपाल्स येथील एका चर्चमधील पवित्र भांड्यात ठेवले आहे. अर्थात ते गोठून गेले आहे. पण, पोप फ्रान्सिस हे त्या चर्चमध्ये गेले. त्यांनी त्या पवित्र भांड्याचे चुंबन घेतले आणि काय आश्चर्य! म्हणे, ते रक्त द्रवू लागले. म्हणजे सगळेच रक्त द्रवले नाही, थोडेसे द्रवले, तर रक्ताचे हे असे अर्धवट द्रवणे म्हणजे पोप फ्रान्सिस यांच्या संतत्वाच्या पात्रतेची गुणवत्ता आहे. अजून अशाप्रकारे दीड किंवा किमान एक ‘रिलीजिअस मिरॅकल’ केले की, ते संतत्वाला पोहोचलेच म्हणून समजा. तर, या सगळ्या प्रकाराला आपण ‘अंधश्रद्धा’ म्हणायच्या नाहीत बरं का? कारण, ‘रिलीजिअस मिरॅकल’ कुठेही होतात. आपल्याकडे नाही का, दयाळू येशूबापाच्या दयाळू धर्माच्या प्रसारासाठी आयुष्य वेचलेले फादर दिब्रिटो चक्क साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हे सुद्धा एक ‘रिलीजिअस मिरॅकल’च आहे.

@@AUTHORINFO_V1@@