आतंकवाद्यांसोबत धुमश्चक्रीत २ जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |


jammu_1  H x W:



नौशेरा : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरूच आहे. या चकमकीत दोन सैनिक शहीद झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेराव घातला. त्यादरम्यान ही चकमक झाली.सध्या चकमक झाली त्याठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टरमध्ये शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.



नौशेरा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराच्या हाती लागली. त्यानंतर लष्करी जवानांनी सेक्टरमध्ये शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दोन जवानांवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. 
जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी माहिती देताना सांगितले. दहशतवादी संघटनांमध्ये जाणाऱ्या स्थानिक युवकांच्या संख्येतही घट झाल्याचे सिंह म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@