नव्या वर्षात सात लाख नोकऱ्या, आठ टक्के वेतनवाढही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |
JOB _1  H x W:
 

 

नवी दिल्ली : नव्या वर्षात देशातील खाजगी क्षेत्रात सुमारे सात लाख नवीन नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याशिवाय यंदा सरासरी आठ टक्के वेतनवाढ देतील, असा अंदाज एका सर्वेक्षणाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. मायहायरिंगक्लबडॉटकॉम व सरकारी-नौकरीडॉटइन्फो या दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार खाजगी क्षेत्रातील देशभरातील ४२ शहरांमधील ४ हजार २७८ कंपन्यांनी नोकरभरतीचे संकेत दिले आहेत.

सन २०१९ मध्ये अशाच सर्वेक्षणात ६ लाख २० हजार नोकर्‍यांचा अंदाज व्यक्त केला होता. यापैकी ५ लाख ९० हजार रोजगार निर्माण झाले होते. दुसर्‍या आणि तिसर्‍या स्तरातील शहरांमधील खर्च तुलनेत कमी असल्याने अनेक कंपन्या या शहरांमध्ये उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. २०२० मध्ये १२ वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात सात लाखांहून अधिक नोकर्‍या निर्माण होतील, असे सरकारी-नौकरीडॉटइन्फोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले.

 

यंदा वेतनवाढ आणि बोनसमध्ये सरासरी वाढ होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. याशिवाय विविध कंपन्यांकडून सरासरी आठ टक्के वेतनवाढ आणि बोनस १० टक्के असेल, असेही म्हटले आहे. अधिकाधिक नोकर्‍या मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली-एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे अशा शहरांमध्ये उपलब्ध असतील. या आठ शहरात ५ लाख १४ हजार ९०० नोकर्‍या निर्माण होतील आणि उर्वरित रोजगारसंधी दुसर्‍या व तिसर्‍या स्तराच्या शहरांमध्ये निर्माण होतील, असेही यात म्हटले आहे.
 

रिटेल, ई-कॉमर्समध्ये सर्वाधिक रोजगार

सर्वेक्षणानुसार, २०२० साली सर्वाधिक रोजगार (१ लाख १२ हजार) रिटेल व ई-कॉमर्स क्षेत्रात निर्माण होण्याची शक्यता आहे. यानंतरचा क्रम माहिती तंत्रज्ञान व आधारित सेवा क्षेत्राचा असून त्यात १ लाख ५ हजार ५०० नोकर्या उपलब्ध होतील. त्यानंतर आरोग्यसेवा क्षेत्र (९८ हजार ३०० नोकर्‍या), एफएमसीजी (८७ हजार ५००) व बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्र (५९ हजार ७००) यांचा क्रम लागतो.

 

२०१९ साली ५.९ लाख नोकर्‍या

सदर सर्वेक्षणानुसार, नुकत्याच संपलेल्या २०१९ वर्षात ६.२ लाख नोकर्‍यांच्या अंदाजाच्या तुलनेत ५.९ लाख नोकर्‍या निर्माण झाल्या. नव्या वर्षात देशाच्या दक्षिण भागात सर्वाधिक नोकर्‍या उपलब्ध असतील. देशाच्या दक्षिण भागात २ लाख १५ हजार ४०० नोकर्‍या, उत्तर भागात १ लाख ९५ हजार ७००, पश्चिम क्षेत्रात १ लाख ६५ हजार ७०० तर, पूर्व क्षेत्रात १ लाख २५ हजार ८०० रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@