संजय राऊत यांनी 'ती' पोस्ट डिलीट केली ? का करावी लागली ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |
Sanjay _1  H x
 


मुंबई : 'हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल कर रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ समय और समर्पण', अशी पोस्ट नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र, अवघ्या काही वेळातच त्यांनी ती पोस्ट डिलीटही केली. याच पोस्टवरून संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुखांना थेट इशारा देत आहेत का ?, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे राऊतांनी अखेर ही पोस्ट डिलिट करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असताना नाराज संजय राऊत मात्र, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना काहीसे भावूक झाल्याचे दिसले. सोशल मीडियावरून सतत सक्रीय आणि आक्रमक असणारे संजय राऊत गेले काही दिवस नरमल्याचे दिसत होते.संजय राऊत यांच्या पोस्टमधील आक्रमकपणा काहीसा मवाळ झाला असून त्यांनी लिहिलेल्या पोस्टचा वेगवेगळा अर्थ राजकीय वर्तूळात घेतला जात आहे.


 
 
 

"मी नाराज नाही, मी कुठल्याही सरकारी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही," असे सांगत खासदार संजय राऊत यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांना नाराजी लपवताला आलेली नाही. ३१ डिसेंबर रोजी संजय राऊत यांनी एक पोस्ट केली. "साल जरुर बदल रहा है, लेकीन साथ नही बदला, स्नेह सदा बना रहे |...", या पोस्टद्वारे त्यांनी नेमका इशारा कुणाला दिला हे समजू शकले नाही. त्यानंतर बुधवारी १ जानेवारी रोजी नव्या वर्षानिमित्त शुभेच्छा न देता आणखी एक शायरी पोस्ट केली.



 

'हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल कर रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ समय और समर्पण' संजय राऊत यांच्या या वाक्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा ते खुद्द राऊत स्पष्ट करतीलच अशी अपेक्षा होती. मात्र, काही घडण्य़ापूर्वी राऊत यांनी ही फेसबूक पोस्ट डिलीट केल्याने पुन्हा एकदा याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या. मात्र, हा संदेश शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी तर नाहीना, अशी दबक्या आवाजातील चर्चा सध्या सुरू होती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी तसे काहीच नसल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले. मात्र, त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे ते नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली. अखेर पोस्ट डिलिट करत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

@@AUTHORINFO_V1@@