"ठाकरेंना खुश करण्यात घालवला सर्व वेळ, पण..." निलेश राणेंचे टीकास्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : नुकतेच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी झाला. यामध्ये अनेक बड्या नेत्यांना, मित्रपक्षांना आणि त्या त्या पक्षाशी निगडित विश्वासू नेत्यांना डच्चू देण्यात आला. यावरून बऱ्याच नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. डावलेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते रामदास कदमही नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी कडाडून टीका केली.

 

"रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले." अशा तिखट शब्दात त्यांनी रामदास कदमांवर टीका केली. त्यांनी ट्विट केले की, "रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे."

.

@@AUTHORINFO_V1@@