नवे वर्ष नवा संकल्प! चांद्रयान ३, गगनयानसह अनेक महत्त्वकांशी उड्डाणांसाठी इस्त्रो सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |
k Civan _1  H x
 

बंगळुरू : इस्त्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी अनेक महत्वकांशी योजना जाहीर केल्या आहेत. वर्ष २०२० हे गगनयान आणि चांद्रयान ३ मिशन आदींची तयारी करत आहेत. इस्त्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी बंगळुरूतील इस्त्रो मुख्यालयात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच देशवासीयांचे आयुष्य अधिक सुलभ बनवण्याची तयारी इस्त्रो करत आहे. गगनयान आणि चांद्रयान दोन्ही मोहीमांची बरीचशी तयारी २०१९ या वर्षात पूर्ण झाली आहे.

 

के. सीवन म्हणाले, "गगनयावर गेल्या वर्षात खूप काम झाले आहे. यासाठी चार अंतराळवीरही निवडण्यात आले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. गगनयानसाठी राष्ट्रीय सल्लागार समिती बनवण्यात आली आहे.

 इस्त्रोला चांद्रयान ३ साठी परवानगी मिळाल्याची माहितीही के. सीवन यांनी दिली. त्यावर कामकाज सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. याची प्रक्रिया आणि कॉन्फिगरेशन चांद्रयान २ प्रमाणेच असणार आहे. यात लॅण्डर आणि रोव्हरही असणार आहे. इस्त्रोच्या चांद्रयान २ ची जगभरात चर्चा झाली होती.


देशातील दुसऱ्या स्पेस पोर्ट भूमीअधिग्रहणाची प्रक्रीया सुरू झाली आहे. तामिळनाडूतील तूतीकोरीन येथे देशातील दुसरे पोर्ट उभारले जाणार आहे. येत्या काळात इस्त्रोतर्फे मंगळ ते शनिपर्यंत आणखी नवीन मोहिमा आखल्या जाणार आहेत. इस्त्रोच्या गगनयान मिशनसाठी रशिया मदत करणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@