भारत-पाकिस्तान दरम्यान अणुशक्ती विषयक माहितीची देवाण घेवाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |


indo pak_1  H x


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश झाल्यानंतर युद्ध झाले तर काय करायचे यावर चिंता व्यक्त होत होती. जपानवर झालेल्या अणुहल्ल्याचे भीषण परिणाम अवघ्या मानवाजातीवरच झाले हे संपूर्ण जगाने पाहिले होते त्यामुळे एखाद्या देशांकडे अणुबॉम्ब असले तरी ते प्रत्यक्ष वापरले जात नाहीत. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास अणुकेंद्र असलेल्या ठिकाणी हवाई हल्ले केले जावू नयेत असे संकेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भारत आणि पाकिस्तानने ३१ डिसेंबर १९८८ मध्ये एक करार केला होता. २७ जानेवारी १९९२पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. जबाबदार देश म्हणून भारताने आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही असा निर्णय घेतलाय. मात्र पाकिस्तानकडू कायम अणू हल्ल्याची धमकी दिली जाते या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांच्या अण्विक प्रतिष्ठानांची यादी एकमेकांना सादर केली.


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
, ‘अण्वस्त्र प्रतिष्ठानांवर हल्ल्याचा निषेध' करण्याच्या कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांनी बुधवारी अण्विक प्रतिष्ठान व सुविधा याद्यांची देवाणघेवाण केली. ही देवाणघेवाण नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे एकाच वेळी दूतावासाच्या माध्यमातून केली गेली. दोन्ही देशांमधील अशा प्रकारच्या यादीची देवाणघेवाण बाबतची ही सलग २०वी बैठक आहे.पहिली एक्सचेंज जानेवारी १९९२ मध्ये झाली. निवेदनात म्हटले आहे की, ‘दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत या माहितीची देवाण घेवाण झाली आहे.'

@@AUTHORINFO_V1@@