निर्भया प्रकरणातील त्या चौघांना एकाचवेळी फाशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |


tihar nirbhaya_1 &nb



नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी तिहार तुरुंगात ३ नवीन तख्त ही तयार करण्यात आले आहे. या तुरुंगात आधीपासूनच एक तख्त आहे. आता तिहार तुरुंग हा देशातला पहिला असा तुरुंग झाला आहे, जेथे एका वेळी फाशीचे चार तख्त असणार आहेत. तिहारमधील तुरुंग क्रमांक तीन मध्ये हे नवीन तख्त बांधण्यात आले आहे. तिहार तुरुंगाच्या सूत्रांची अशी माहिती आहे की हे काम पूर्ण करण्यासाठी तुरुंगाच्या आत जेसीबी मशीन आणली होती. कारण फाशी देण्याची जी विशिष्ट जागा असते तेथे खाली एक बोगदा देखील बनवला जातो. फाशी दिल्यानंतर मृत कैद्याला या बोगद्यातून बाहेर काढले जाते. याठिकाणी १ तख्त आधीच होता या जुन्या तख्ताला देखील बदलण्यात आले आहे.



सध्या निर्भया प्रकरणातील चारही गुन्हेगार तिहार तुरुंगातील क्र. २ आणि ४ मध्ये आहेत. जेव्हा त्यांच्या फाशीसंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कोर्टातून ब्लॅक वॉरंट जारी केला जाईल
, तेव्हा चौघांना तुरुंगातील ३ क्रमांकाच्या सेलमध्ये हलवण्यात येईल. हा कक्ष फाशीच्या तख्ताजवळचा कक्ष आहे.या चौघांच्या प्रकरणांचे स्टेटस रिपोर्ट तुरुंग प्रशासन न्यायालय उघडल्यावर देणार आहे. कोर्ट ६ जानेवारीला उघडणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@