तीनही दलांना आणखी सक्षम करण्याचे ध्येय ; सीडीएस प्रमुख बिपीन रावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


सीडीएसचे प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला

 

नवी दिल्ली : देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला. भारतीय लष्कराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. देशाच्या लष्करप्रमुख पदावरून मंगळवारी ते निवृत्त झाले. त्यानंतर चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १ जानेवारीला त्यांनी सीडीएसचा पदभार स्वीकारला.

 
 
 

"लष्कराच्या तीनही दलांना एकत्र मिळून आणखी सक्षम करण्याचे ध्येय आहे. तीनही दलांमध्ये समनव्य ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तिन्ही दल एक 'टीम' म्हणून एकत्र काम करतील. " असा विश्वास त्यांनी दर्शवला. बिपिन रावत यांना यावेळी तुमच्यावर ठराविक राजकीय विचारसरणीचा प्रभाव असल्याच्या आरोपांसंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं की, “लष्कर राजकारणापासून दूर राहतं. जे सरकार सत्तेत आहे त्याच्या आदेशानुसार आम्हाला काम करावं लागतं”.

@@AUTHORINFO_V1@@