इस्त्रोकडून सुखद वार्ता : विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुस्थितीत उभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |


संपर्क प्रस्थापित करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न

 


बंगळुरू : 'चांद्रयान-२' संदर्भात आता आणखी एक सुखद वार्ता इस्त्रोने दिली आहे. गेले दोन दिवस या मोहिमेवर लक्ष ठेवून असणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "विक्रम लँडर नियोजित ठिकाणी उभा आहे. त्याचे कोणतेही नुकसान झालेले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर थोड्या तिरक्या स्थितीत उभ्या असलेल्या या लँडरशी पुन्हा संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

लँडरशी संपर्क होण्याची ७० टक्के शक्यता

इस्त्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची अजून ६० ते ७० टक्के शक्यता आहे. लँडरचा एक जरी भाग निकामी झाला तरीही त्याच्याशी संपर्क करण्यास कठीण होणार आहे. त्यामुळे इस्त्रो पुन्हा एकदा संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

 

विक्रम लँडर सुस्थितीत

विक्रम लँडरबद्दल मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सारं काही सुस्थितीत आहे. विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर असल्याने त्याच्याशी इतर स्पेस स्टेशनसारखा संपर्क करणे कठीण आहे. लँडरचा अँटिना ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरकडे असेल तर इस्त्रोचे काम सोपे होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@