दीड वर्षात एस-४०० क्षेपणास्त्र भारताच्या ताफ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांनी रविवारी केलेल्या घोषणेनुसार, 'एस-४००' क्षेपणास्त्र भारताकडे नियोजित वेळेत सोपवले जाईल. बोरिसोव यांनी एका प्रसिद्धीमाध्यमाला दिलेल्या माहितीत म्हटले की, भारताने या करारातील सर्व रक्कम सुपूर्द केली आहे. येत्या दीड वर्षात हे क्षेपणास्त्र भारताकडे देण्यात येईल. गेल्या वर्षी पाच ऑक्टोबर रोजी द्विपक्षीय बैठकीत हा करार करण्यात आला आहे. भारताने रशियासोबत एकूण ५.४३ अब्ज डॉलरचा करार यावेळी केला होता.

 

गेल्या महिन्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियातील दूतावासांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत भारताने 'एस-४००' या क्षेपणास्त्रासंबंधीच्या सर्व उर्वरित प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. भारताला नियोजित वेळेत क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी सर्व रक्कम आगाऊ देणे गरजेचे होते. त्यानुसार आता २०२० पर्यंत हे क्षेपणास्त्र भारताच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@