'त्या' मृत पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत व नोकरीचे पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |



मुंबई : मुंबईत ४ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मदतीचा हात दिला आहे शिवाय एका वारसाला नोकरीचे पत्रही देण्यात आले आहे. ४ सप्टेंबर रोजी मुंबईत काही ठिकाणी जलमय स्थिती झाल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या 'पी दक्षिण विभागाचे सफाई कर्मचारी जगदीश परमार (५४) व विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार, परमार व बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचे नियुक्तीपत्र आणि सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख एवढ्या रकमेचा धनादेश सह आयुक्त अशोक खैरे, सहायक आयुक्त चंदा जाधव आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी ७ सप्टेंबर रोजी सुपूर्द केले.

 

४ सप्टेंबरच्या अतिवृष्टीत पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली तर रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. हजारो नागरिक कार्यालय, नोकरीच्या ठिकाणी अडकून पडले. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या "पी दक्षिण" विभागातील कामगार जगदीश परमार हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयरोगाचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला, तर सफाई कामगार विजेंद्र बागडी हे कर्तव्यावर असताना त्यांचा तोल जाऊन ते वाहत्या पाण्यात पडल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. या अनुषंगाने दोन्ही कर्मचाऱ्यांची देणी व अन्य रक्कम इत्यादी विषयाची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित खात्याला दिले होते. त्याप्रमाणे त्यावर प्रशासनातर्फे कार्यवाही करण्यात आली.

 
@@AUTHORINFO_V1@@