'युनाइट्स' आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अंतर्गत सामंजस्य ठराव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |



पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहार, तंत्रज्ञान आणि इतर सेवांसाठी तांत्रिक मदत मिळणार


सोलापूर : 'युनाइट्स बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड' (युबीएसपीएल) आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन (मर्यादित) अंतर्गत सोलापूर येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सामंजस्य ठराव मंजूर झाला. त्यानुसार युनाइट्स, फेडरेशनच्या सर्व सभासद असलेल्या पतसंस्थांची एकमेव मध्यवर्ती संस्था म्हणून सर्वांना सेवा देण्यात येणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पतसंस्थांचा व्यापार व विस्तार वाढविण्यासाठी आणि सबळ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

दैनंदिन व्यवहार, तंत्रज्ञान आणि इतर सेवा यासंदर्भात युनाइट्स संपूर्ण मार्गदर्शन करेल. याशिवाय युनाइट्स प्रॉडक्ट्स बाबत संपूर्ण माहिती उपलबध करून देईल. फेडरेशनच्या सभासद असलेल्या सर्व पतसंस्थांना संपूर्ण सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि इतर तंत्रज्ञानाबद्दल सल्ला तसेच, प्रशिक्षित आणि प्रशिक्षणार्थी उमेदवार किंवा कर्मचारी 'युनाइट्स'कडून प्रदान करण्यात येणार आहेत.

 

ठराव मंजूर झाल्यानंतर, युनाइट्सच्या प्रशिक्षण उपक्रमामध्ये सहकारी असलेल्या लक्ष्यवेध 'इन्स्टिटयूट ऑफ लीडरशिप अॅण्ड एक्सलेन्स' या संस्थेचे संस्थापक आणि संचालक अतुल राजोळी यांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात त्यांनी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. 'कारण या सुलभीकरणामुळे या जिल्ह्यातील हजारो पतसंस्थाना या सेवांचा लाभ होणार आहे', असा उल्लेख केला. या सहकारी पतसंस्थांसाठी पुढील एका वर्षाचे मासिक प्रशिक्षण दिनदर्शक तयार करण्यात आले.

 

'दिलीप पतंगे यांनी हा जो आदर्श असा पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल यूनाइट्स बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक श्री संजय ढवळीकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. संपूर्ण जिल्ह्यातील सर्व फेडरेशन्सनी अशा प्रकारचा पुढाकार घ्यायला पाहिजे', असे मत त्यांनी व्यक्त केले. फेडरेशनच्या सोयीनुसार त्यांचे सभासद असलेल्या सर्व पतसंस्थांसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

 

युनाइट्स बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सहकार क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर सोयी आणि सुविधा उपलबध करून देते. सहकारमधील संस्थांच्या कार्यपद्धतीत सुधारणा (प्रोसेस ऑटोमेशन आणि रिइंजिनीरिंग) करून त्यांना खासगी संस्थांच्या बरोबरीने काम करण्यासाठी सक्षम करते. नुकतेच कंपनीने "बदलते बँकिंग नवभारतासाठी" हा उपक्रम सहकारी बँकांसाठी राबवला. भविष्यातील बँकिंग आणि त्यासाठीची तयारी यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच 'डिजिटलायजेशनचे महत्व आणि फायदे' यावर पण मार्गदर्शन केले गेले.

 

'युनाइट्स' ही प्रक्रिया] ऑटोमेशन, डिजिटायजेशन, ऑडिट प्रोसेस, रिस्क मॅनेजमेंट यामध्ये सहकार क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणारी अग्रगण्य कंपनी आहे. नुकतेच युनाइट्सला बेस्ट फिनटेक कंपनी ऑफ द इयर” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@