'स्कूल बस'वर 'बेस्ट' उदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |



मुंबई : शालेय बस गाड्यांना पार्किंग शुल्कात सवलत देण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी घेतला आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुलभ व सुरळीत होण्यासाठी महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगला प्रतिबंध होण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यासह वाहनतळांचे विविध पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

 

यानुसार बेस्ट डेपोमध्ये खाजगी गाड्यांना सशुल्क पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत शालेय बस संघटनेने केलेल्या विनंतीनुसार शालेय बसकरिता शुल्कामध्ये कपात करण्याचे ठरले असून सुधारित दर लवकरच निश्चित केले जातील असा निर्णय महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात वाहतूक सुलभीकरणाबाबत एक विशेष समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, वाहतूक पोलीस खात्याचे सहआयुक्त मधुकर पांडे, महपालिकेच्या मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारीरमानाथ झा व तज्ज्ञ सदस्य शिशिर जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, पोलीस वाहतूक खात्याचे सर्व उपायुक्त यांच्यासह महापालिका, वाहतूक पोलीस,बेस्ट उपक्रम यांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बेस्ट बस डेपोंमध्ये शालेय बसेस पार्क करण्यास असलेल्या शुल्कात कपात करण्याची विनंती शालेय बस संघटनेमार्फत करण्यात आली होती. या अनुषंगाने समन्वय बैठकीत सविस्तर चर्चा होऊन शालेय बसेससाठी पार्किंग दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित दरपत्रक लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@