२४ उद्याने २४ तास खुली राहणार : वाचा कोणत्या उद्यानांचा सामावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2019
Total Views |
 
 


मुंबई : मुंबई महापालिकेची उद्याने सायंकाळी ७ ते ८ वाजल्यानंतर बंद ठेवण्यात येत होती. मात्र, यापुढे मुंबईतील २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यावरण व आरोग्याच्यादृष्टीने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा पर्यावरणाच्या व आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम होत आहे. मात्र, उद्यानखात्याच्या अखत्यारितील महापालिकेची उद्याने खुली राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ ७ ते ८ च्या दरम्यानची होती.

 

त्यामुळे मुंबईकर नागरिकांना हवा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अखत्यारितील जागांचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळांचे वेळापत्रक उद्यानांच्या प्रवेशद्वाराजवळ लावले जाणार असल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

.

२४ तास खुली राहणारी उद्याने


शहर विभाग

‘ए’ विभाग : कुपरेज बॅण्डस्टॅण्ड उद्यान

‘सी’ विभाग : भगवानदास तोडी उद्यान

‘डी’ विभाग : टाटा उद्यान

‘ई’ विभाग : अब्दुला बरेलिया उद्यान

‘एफ’ उत्तर : महेश्वरी उद्यान

‘एफ’ दक्षिण : बिंदू माधव ठाकरे उद्यान,

‘जी’ दक्षिण : आद्य शंकराचार्य उद्यान

‘जी’ उत्तर : आजी आजोबा उद्यान


पूर्व व पश्चिम उपनगर

‘एच’ पूर्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान

‘एच’ पश्चिम : रावसाहेब पटवर्धन उद्यान

‘के’ पूर्व : श्री साईलीला मनोरंजन मैदान

‘के’ पश्चिम : कमलाकरपंत वालावलकर मनोरंजन मैदान

‘पी’ दक्षिण : वेदप्रकाश चड्ढा उद्यान

‘पी’ उत्तर : स्वतंत्रता उद्यान

आर’ दक्षिण : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान

‘आर’ मध्य : गांजावाला उद्यान

‘आर’ उत्तर : जरीमरी उद्यान

‘एल’ विभाग : छत्रपती शिवाजी महाराज उद्यान

‘एम’ पूर्व : बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान

‘एम’ पश्चिम : डी. के. संधू उद्यान

‘एन’ विभाग : डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान

‘एस’ विभाग : शहीद जयवंत हनुमंत पाटील मनोरंजन उद्यान

‘टी’ विभाग : लाला तुळशीराम उद्यान

@@AUTHORINFO_V1@@