राम जन्मभूमीचा प्रश्न महिन्याभरात मार्गी : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2019
Total Views |



बारामती : अय्योध्येतील राम जन्मभूमीच्या प्रश्नाबाबात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी रविवारी महत्वाचे विधान केले. ते म्हणाले, “केंद्रामध्ये मजबूत सरकार आल्यामुळे भाजपच्या बौद्धीक अजेंड्यावरील एकापाठोपाठ एक विषय मागी लावले जात आहेत. आता महिनाभरात राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत,” अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली.


बारामती येथे भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले
. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “केंद्रातीप भाजप सरकारने आपल्या अजेंड्यावरील अनेक विषय मार्गी लावले आहेत. 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काश्मिर प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. काश्मिरमधील कलम 370 व 35ए रद्द करून दाखवले. तसेच तीन तलाक कायदा करून मुस्लिम महिलांच्या पायातील बेडी सोडविली. राज्यामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत. त्यामुळे पुन्हा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. हे राष्ट्रवादा काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील सांगा, ” असे पाटील यावेळी म्हणाले. 

 
 
@@AUTHORINFO_V1@@