लो. सेवा संघातील गणेशाला नतमस्तक ; पं. मोदींचा महाराष्ट्र दौऱ्याचा श्रीगणेशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2019
Total Views |



मुंबई : शहरातील विविध मेट्रोमार्गिकांच्या भूमिपूजनासाठी आणि राज्यभरातील अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणरायाला वंदन करून आपल्या दौऱ्याचा श्रीगणेशा केला. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सकाळी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, . पराग अळवणी, नगरसेविका ज्योती अळवणी, नगरसेवक अभिजित सामंत, नगरसेविका सुनीता मेहता, नगरसेवक अनिष मकवनी आणि मुरजी पटेल उपस्थित होते.

 
 
 


मोदी यांनी यावेळी लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहातील गणपतीचे दर्शन घेतले. गणरायाच्या दर्शनासोबत त्यांनी लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादनही केले. तसेच थोर साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लोकमान्य सेवा संघातील पु.ल.गौरव कला दालनात पु.ल. यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी या दालनात आलेली मंडळी दिवसातून किती तास हसतात ? असे विचारत “पु.ल.देशपांडे का नाम बोले और हसे नहीं, तो कैसे चलेगा?” असे उद्गार काढत पु. ल. देशपांडेंच्या गुणवैशिष्ट्यांचा गौरव केला. गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी लोकमान्य सेवा संघातील ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ग्रंथसंग्रहालयालाही भेट दिली. यावेळी लोकमान्य सेवा संघांचे अध्यक्ष मुकुंद चितळे, उपाध्यक्ष दीपक घैसास आणि कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांनी संस्थेच्या कार्याबाबत पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली. संस्थेकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची त्यांनी यावेळी मोदी यांना माहिती दिली. संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर मोदी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यापुढेही अशाच प्रकारे समाजसेवेचे कार्य सुरू ठेवण्याचा कानमंत्र दिला.

 

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाचा हा शताब्दी महोत्सव असून यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी येथे आपली उपस्थिती दर्शवली होती. ऐतिहासिक मूल्य असलेल्या शतक महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त लोकमान्य सेवा संघाचे तसेच विलेपार्लेच्या सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुकही केले. मोदींनी या प्रसंगी विलेपार्ल्याच्या इतिहासाचे दोनही खंड संस्थेमार्फत तर आ. पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणी लिखित तसेच ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर लिखित पुस्तकेही देऊन स्वागत करण्यात आले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@