मुंबईच्या 'गती'वर देशाची 'प्रगती' : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2019
Total Views |



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये मेट्रो १०, मेट्रो ११, मेट्रो १२ या तीन मेट्रो मार्गांचे तसेच मेट्रो भवनाचे भूमिपूजन केले. त्यानंतर मेट्रो ७ वरील बाणडोंगरी स्थानकाचेही उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांच्या स्पिरीटचे कौतुक करत मुंबईच्या विकासाच्या गतीवर देशाची प्रगती अवलंबून आहे असेही सांगितले. तसेच, पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने केली. 'गणशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा' अशा शब्दात मराठीत शुभेच्छा देत त्यांनी भाषण सुरु केले.

 

मुंबईकरांचे स्पिरिट प्रेरणादायी

 

"मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला खूप प्रेम दिले. निवडणूक प्रचारादरम्यान जिथेही मी गेलो तिथे स्नेह मिळाले यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. मी रशियामध्ये होतो तेव्हा मुंबई पाऊस आणि पाण्याच्या स्थितीबद्दलची माहिती घेत होतो. तसेच, मुंबईचे कष्टकरी नागरिकांचे मुंबईवर प्रेम आहे. 'आमची मुंबई'च्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी किती कष्ट घेतले आहेत ते मला माहित आहे." असे म्हणत मुंबईकरांचे आणि फडणवीस सरकारचे त्यांनी कौतुक केले.

 

"आजच्या घडीला देश ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही २१ व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार आहे. याच विचारासह आपलं सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे" असेदेखील त्यांनी यावेळेस सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@